Marathi Status On Life
मराठी स्टेटस जीवन
जीवन चहा बनवण्यासारखे आहे..
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि,
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा,
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.
thought on life in Marathi
या जगात कुणीही आपला मित्र किंवा,
शत्रू म्हणून जन्माला येत नाही.
आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती,
यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.
छोट्या या आयुष्यात,
खूप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच मिळत नसतं,
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं…
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,
माणसाला मिळत नसतात,
पण न मिळणाऱ्या गोष्टीच,
माणसाला का हव्या असतात…?
thought on life in Marathi
विश्वास एखाद्यावर इतका करा की,
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.