
Life Status in Marathi | 3500+ बेस्ट मराठी जीवन स्टेटस
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा Life Status in Marathi, Life Quotes in Marathi संग्रह वाचायला हवा.
Life Status in Marathi
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.
सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
Life Status in Marathi
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो.
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.
Life Status in Marathi
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली,
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं.
मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
Life Quotes in Marathi
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.

उद्याचं काम आज करा,
आणि आजचं काम आत्ताच करा.
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात,
तर तो तुमचाच दोष आहे.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.
अशा माणसाला कधीच गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
आदर, काळजी आणि प्रेम असेल.

प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.
कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.”
आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.”
एकमेकांविषयी
बोलण्यापेक्षा,
एकमेकांशी बोलण्याने
वाद मिटतात.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
तुमचा हात रिकामा करीत असते.
Life Quotes in Marathi
असं काम करा की,
नाव होऊन जाईल..
नाही तर, असं नाव करा की,
लगेच काम होऊन जाईल.

ऐकणं महत्वाचं आहेच,
पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते
आचरणात आणणं..
किती ऐकलं यापेक्षा आचरणात
किती उतरवलं, यावरच माणसाचं
यशापयश अवलंबून असतं.
Life Quotes in Marathi
दोष लपवला की तो मोठा होतो,
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत,
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
Life Status in Marathi
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
आपले सौख्य हे
आपल्या विचारांवर अवलंबून असते.
पाप ही अशी गोष्ट आहे
जी लपवली की वाढत जाते.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा,
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य
तलवार असते तोवरच टिकतं.
चिंता हा कुठल्याही दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
Life Status in Marathi
परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.
जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका,
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक
करायलाही मन मोठं लागतं.
तुम्हाला मोठेपणी कोण
व्हायचंय ते आजच ठरवा.. आत्ताच!
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे,
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
Life Quotes in Marathi
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
आपला जन्म होतो तेव्हा आपण
रडत असतो आणि लोक हसत असतात,
मरतांना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
जे झालं त्याचा विचार करू नका,
जे होणार आहे त्याचा विचार करा.
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
Marathi Status On Life
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.
दु:ख कवटाळत बसू नका,
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर?
दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे
स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.
Life Status in Marathi
स्वतःच्या हिमतीवर
मेहनत करून जगण्यात
जी मजा आहे ती इतर
कशातच नाही.
आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कोणतीही
गोष्ट अवघड नाही.
हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावे लागते..
कसे आहे विचारले तर,
मजेत म्हणावे लागते.
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
आयुष्यात कोणत्याही मुलीचा
हात धरायला,
हिम्मत लागत नाही..
हिम्मत लागते ती,
तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला.
भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर,
आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.
म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून,
पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.
चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही,
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.
भूतकाळाच्या आठवणीत रमून,
भविष्याची चिंता करणे
याला मूर्खपणा म्हणतात.
आयुष्यातील सर्वात सोपा नियम:
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,
ते इतरांसोबत करू नका.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका..
नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
Life Thoughts in Marathi
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं..
इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.
माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम, वागण्यात नम्रता,
आणि हृदयात गरिबीची जाण,
असली की, बाकी गोष्टी
आपोआप घडत जातात.
आयुष्यात एकदा तरी,
“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय,
“चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही !
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे..
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात,
ते महत्वाचं नाही,
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत,
याला महत्व आहे.
आपल्या आयुष्यात,
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका !
कारण जेव्हा ते बदलतात,
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !
Life Status in Marathi
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी,
एवढेच करा.
चुकलं तेव्हा माफी मागा,
आणि कुणी चुकलं तर माफ करा.
जीवन चहा बनवण्यासारखे आहे.
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि,
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा,
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.
या जगात कुणीही आपला मित्र किंवा,
शत्रू म्हणून जन्माला येत नाही.
आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती,
यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.
Life Quotes in Marathi
छोट्या या आयुष्यात,
खूप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच मिळत नसतं,
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,
माणसाला मिळत नसतात,
पण न मिळणाऱ्या गोष्टीच,
माणसाला का हव्या असतात ?
विश्वास एखाद्यावर इतका करा की,
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.
प्रेमळ माणसं ही,
इंजेक्शन सारखी असतात,
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो.
Marathi Shayari on Life
जगाला काय आवडते ते करू नका,
तुम्हाला जे वाटते ते करा,
कदाचित उद्या तुमचे वाटणे,
जगाची “आवड” बनेल.
किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावं ते हासून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा
आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की,
हे तुला कधीच जमणार नाही.
इच्छा किती विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
Life Status in Marathi
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी,
त्रास करून घ्यायचा की नाही
हे आपल्याच हातात असते.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात,
आणि अपयशी लोक
जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
झोपेत पडलेली स्वप्ने,
कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात,
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात.
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.
ताकदीची गरज त्यांनाच लागते,
ज्यांना काही वाईट करायचे असते,
नाही तर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते,
कारण प्रेमानेच जग जिंकता येते.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते.
Life Status in Marathi
रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते.
कोणीतरी बर्फाला विचारले,
आपण एवढे थंड कसे?
बर्फाने अगदी छान उत्तर दिले,
माझा भूतकाळ पण पाणी
आणि भविष्यकाळ पण पाणीच!
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ?
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा.
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडे आहे,
सोडवाल तितके थोडे आहे.
माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो,
परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो.
जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो,
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो.
मराठी स्टेटस जीवन
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते,
त्यांचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
प्रेमाने जोडलेली चार माणसे,
आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत.
किती त्रास द्यावा एखाद्याला,
यालाही काही प्रमाण असते,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते.
सरकारी बसमध्ये बसायला – नको,
(Government) सरकारी शाळेत शिक्षण – नको,
सरकारी दवखाण्यात उपचार – नको,
मुलीला मात्र नवरा फक्त.
“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
Life Status in Marathi
कधी कधी संकटे आली की,
२ पावले मागे सरकनेच हिताचे असते,
वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे,
तर पुढे झेप घेण्यासाठी.
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून.
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा,
कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते,
आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो.
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.
Life Quotes in Marathi
जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण
फक्त अंधार झाल्यावरच येते.
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं कधीच विस्मरण
होऊ देऊ नये.
आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.
जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते.
नाही चांगले दिवस,
नाही वाईट दिवस.
Good Thoughts in Marathi about Life
योग्य निर्णय घ्यायचे,
तर हवा अनुभव..
जो मिळतो,
चुकीचे निर्णय घेऊनच!
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणे असतात,
एकतर आपण,
विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो.
जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत,
कारण ती आपणच
निर्माण केलेली आहेत..
हे सूत्र लक्षात घेतले तर,
मनुष्य सरळ वागू शकेल.
Life Status in Marathi
जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे किंवा
उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
Life Status in Marathi
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
आवड असली की
सवड आपोआप मिळते.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
झाडासारखे जगा… खूप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
मराठी स्टेटस आयुष्य
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
Life Quotes in Marathi
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे
आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण
जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
Life Status in Marathi
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना
काही किंमतच उरली नसती.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही.
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
जीवनातला अंध:कार नाहीसा
करणारी ज्योत म्हणजे हास्य !
दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला
माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
प्रवासावरुन केव्हा परतावे
हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
हे हि वाचा : Marathi Status
Reality Marathi Quotes on Life
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
Life Status in Marathi
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,
प्रवासाची दिशाच बदलून जाते,
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.
भविष्य त्यांच्या मालकीचे आहे जे
त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात.
हे हि वाचा : Motivational Quotes in Marathi
जर तुम्हाला Life Status in Marathi, Life Quotes in Marathi चा संग्रह आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आम्हाला Facebook, Pinterest व Instagram वर जरूर फॉलो करा.