Friendship Quotes in Marathi | 1000+ मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Quotes

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते, कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते. आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते. आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते ती मैत्री असते आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते. मित्र आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहेत. आपण त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमवू शकत नाही. परंतु काही कारणामुळे आपल्याला मित्रांची आठवण येते. अश्या वेळी आम्ही तयार केलेले मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश Friendship Quotes in Marathi पाठवून तुम्हाला त्यांची किती आठवण येते व तुम्ही तुमच्या मित्रांसाठी किती महत्वपूर्ण आहात हे दाखवू शकता.

Friendship Quotes in Marathi

मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

friendship quotes in marathi

जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

friendship day quotes in marathi

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.

Friendship Quotes in Marathi

खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

best friend quotes in marathi

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल,
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

best friend shayari in marathi

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो,
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखरे हातून सुटून जातात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

best friend captions in marathi

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

friendship status in marathi

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात.
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

heart touching friendship quotes in marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.

best friendship quotes marathi

मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

जीवनात दोनच मित्र कमवा.
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.

happy friendship day marathi

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

marathi friendship quotes

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

Friendship Quotes in Marathi

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

best lines for best friend in marathi

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

bff quotes in marathi

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.

close friends quotes in marathi

Friendship Day Quotes in Marathi

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

friendship thoughts in marathi

मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.

funny friendship quotes in marathi

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.
sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.

हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

हे हि वाचा : Friendship Quotes in English

Best Friend Quotes in Marathi

मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे.
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजे.

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे,
यात तू स्वतः ला हरवशील,
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना,
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

Friendship Quotes in Marathi

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.

मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा..!

पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी..

आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.

Friendship Shayari in Marathi

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंत पणी यश पाहिजे,
अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.

फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित
झालेली ओळख कायम राहते
कधी हासायचे असत कधी रुसायच असत
मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल.

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.

मैत्री आणि प्रेमात
फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही.

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही,
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,
खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.

श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
काळजाला काळजाची आस असते मैत्री
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.

हे हि वाचा : Friendship Shayari in Hindi

Friendship Message in Marathi

“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो.

नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे .
आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.

मैत्री म्हणजे काय ?
कुठलाही गोष्टीची परवा न करता
एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा
ठेचुन बारिक बारिक करा
तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.
ज्याबद्दल घरचे म्हणतात-
याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत.
ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत.
जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत राहु दे.
तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे.

Friendship Quotes in Marathi

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा
हात आपणच आपलं शोधायचा असतो
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं
रणरणत्या उन्हात सावलीसाठी
एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं.

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्याची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

Best Friend Shayari in Marathi

चांगल्या काळात हात धरणे,
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री.

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही..

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,
एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,
आणि मित्र मिळाले हाणामारीचे.

मैत्री असावी पाण्या सारखी,
निर्मळ, नितळ, स्वछ जशी,
मैत्री असावी समुद्रा सारखी,
उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी,
मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी,
थकलेल्या जीवाला सावली देणारी.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.

आयुष्यात असे लोक जोडा की,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.

मैत्री असावी मना मनाची,
sमैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो.

आपले मित्र ना राजा ना वजीर पण,
मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे.

देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव.

Maitri Quotes in Marathi

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही.

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर.
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी
उभा राहतो हे महत्वाचे आहे.

जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

Friendship Quotes in Marathi

आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

आयुष्यं हे बदलतं असतं !.
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत..
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत..
पण, मित्र मात्र तसेच राहतात..
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..

मित्र म्हणजे, एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,
तुझ्या रूपाने.

ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

हे हि वाचा : Friendship Quotes in Hindi

Friendship Status in Marathi

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.

तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर.

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते.

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे ईमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,
कारण आमचे मित्रच “लय भारी”

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय.

Best Friend Captions in Marathi

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी.

मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट
मैञी म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ
मैञी म्हणजे, स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात..

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Friendship Quotes in Marathi

मैत्री तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्री अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे.

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी.

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं..
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं..
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं..
असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.

Dosti Shayari Marathi

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,
आठवण येण्याचे कारण पाहिजे,
तू कॉल कर किंवा नको करू,
पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

मित्र तुला मानलय, मैत्रीचा अपमान कधी करू नकोस..
जग फार मोठं आहे, त्यात मित्रांना कधी विसरु नकोस..
जीवन काय ते कधीच कळलं नाही,
तो प्रलय आहे त्यात वाहून जाऊ नकोस..
प्रत्येक वळणात अनेक जण भेटतील,
योग्यांना साथ दे अयोग्यांना देऊ नकोस.
तू मित्रांना दुरावाशील मित्र तुला नाही पण
जमलच तर मित्रांना दुरावू नकोस.
अजून काही सांगायचं आहे,
गैरसमज करून घेऊ नकोस.
निखळ मैत्रीची अपेक्षा केली आहे.
अपेक्षाभंग कधी करू नकोस.

मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार;
भावनांच्या आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार.
मैत्रीत तुझ माझ काहीच नसत;
जे काही असत ते आपलच असत..
कधी मस्ती कधी गंभीर ; निराशेच्या अंधारात आशेचा कंदिल.
मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी;
ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी.
मैत्री नसावी एकाबाजूला कललेली ;
ती असावी एकमेकांना समजून घेणारी.
मैत्री असावी आयुष्यभर टिकणारी;
आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.

मैत्री हे फक्त एक बंधन नाही
तर ते स्वतः एक जीवन आहे.

हे हि वाचा : Friendship Quotes in Hindi

मित्रांनो जर तुम्हाला हे Friendship Quotes in Marathi मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये आवडले असतील तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आम्हाला Pinterest, Facebook Instagram वर जरूर फॉलो करा.

Leave a Reply