Marathi Love Status
Marathi love status
जेव्हा आपली आवडती व्यक्ती,
आपल्याशी न बोलता राहू शकते..
या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते,
तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.
भरपूर भांडून पण जेव्हा,
एकमेकांसमोर येता..
आणि एका Smile मध्ये सगळं
काही ठीक होतं ते प्रेम आहे.
तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे,
माहिती नाही..
पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना,
तेव्हा खरंच मला करमत नाही.
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना,
तरी माझा पूर्ण दिवस छान जातो.
का कळत नाही तुला,
माझंही एक मन आहे..
जे फक्त तुझी अन तुझीच,
वाट पाहत आहे.