Love Quotes In Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
love quotes in Marathi
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.