Good Night Messages Marathi
good night messages marathi
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
शुभ रात्री !
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
शुभ रात्री !
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
शुभ रात्री !
विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
शुभ रात्री !
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
शुभ रात्री !
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
2 comments
very nice good night massage thoughts
I like marathi good night status