Good Morning Message In Marathi
good morning wishes in marathi
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
सुप्रभात!
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही…
शुभ सकाळ!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही…
शुभ सकाळ!
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.